मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मुणगे येथील भगवती वाचनालयामध्ये माजी राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त वाचनालया मध्ये ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला वाचनालयाचे अध्यक्ष संतोष लब्दे, उपाध्यक्ष गोविंद सावंत, कार्यवाह शंकर उर्फ सुनिल मुणगेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे कार्यकारीणी सदस्य महादेव उर्फ तात्या प्रभू, सौ.उज्ज्वला महाजन, रमाकांत सावंत, माजी पंचायत समिती सदस्या सौ.संजीवनी बांबुळकर तसेच वाचनालयाचे कर्मचारी विश्वास मुणगेकर, सोमनाथ रुपे, आदी उपस्थित होते. यावेळी सन्.२०२१ – २२ या आर्थिक वर्षात खरेदी केलेल्या ग्रंथाचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष संतोष लब्दे यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये कांदबऱ्या, कथासंग्रह, बाल:वाड:, एकांकीका, कविता संग्रह, धार्मिक ग्रंथ आदी ग्रंथाचा समावेश करण्यात आला होता.
यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष गोविंद सावंत यानी वाचनालयामध्ये येणाऱ्या नियतकालीकांचा तसेच दैनिकाचा लाभ वाचकानी घेऊन वाचनालयामध्ये रोडावत चाललेली वाचन चळवळ वृध्दिंगत होण्यासाठी प्रयत्न वाचकानी करावा. यासाठी वाचनालयाच्या माध्यमातून काही सुविधा कमी पडत असतीलतर त्याबाबत सुचनां करा आम्ही त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न करु.त्याच प्रमाणे शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या आपल्या घरातील विद्यार्थ्यांना वाचनालयामध्ये येऊन पुस्तके वाचनाची सवय लहान वयातच लावली तर वाचनामुळे मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग अभ्यासामध्ये सुध्दा होऊ शकतो. असे शेवटी श्री सावंत म्हणाले. आभार विश्वास मुणगेकर यांनी मानले.