वैभववाडी | नवलराज काळे :
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल लोणीकर यांना दिले आहे. माजी युवा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी वरती वर्णी लागल्यानंतर महाराष्ट्र युवा अध्यक्ष पद रिक्त होते या पदावरती राहुल लोणीकर यांची निवड केल्यानंतर सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. युवकांचे प्रश्न व समस्या जाणून घेत भारतीय जनता पार्टीसाठी युवकांचे एकीकरण करण्याकरिता कटिबद्ध राहून काम करू असे प्रतिपादन श्री राहुल लोणीकर यांनी केले आहे.