25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने चेअरमन, गटसचिव यांचा सत्कार संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कार्यक्रम.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ,मर्यादित कणकवली सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विकास संस्था चेअरमन, गटसचिव यांचा सत्कार सभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शेतकरी संघातर्फे चांगल्या योजना आम्ही राबवत आहोत.गावातील विकास संस्था या खरेदी विक्री संघ आणि सहकार क्षेत्रातील कणा आहेत.त्यामुळे खरेदी विक्री संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चेअरमन, गटसचिव सत्कार करत सन्मान केला आहे.संघाच्या वाटचालीत विकास संस्थाचा महत्वाचा वाटा असल्याचे प्रतिपादन खरेदी विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई यांनी केले.पुढील काळात विकास संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला जोडल्या जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सत्कार मंचावर
चेअरमन विठ्ठल देसाई, व्हॉईस चेअरमन प्रकाश सावंत,माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती बाळा जठार,माजी उपसभापती दिलीप तळेकर,माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री,संचालक प्रकाश परब,वनिता बुचडे व व्यवस्थापक गणेश तावडे तालुक्यातील चेअरमन, गटसचिव उपस्थित होते.

विठ्ठल देसाई म्हणाले की खरेदी विक्री संघाला खत व्यवस्थापन करताना अडचणी येत आहे.खत कंपन्या खतांची आगाऊ रक्कम मागणी करत आहेत.त्यामुळे आता विकास संस्थांनी खताची उचल करण्यापूर्वी होणारी रक्कम जमा करणे आवश्यक आहे.विकास संस्थांसाठी पुढील काळ अवघड आहे.केंद्रीय स्तरावर सहकार खाते स्वतंत्र झाले आहे. नवे बदल होत आहेत.कमी व्यवहार असलेल्या संस्था आता मंडल स्तरावर होणार आहेत. बँक निवडणुकीमुळे निवडणुका झाल्या आहेत.त्याचा अनेक सोसायटीना विनाकारण भुर्दंड सोसावा लागला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला जोडल्या जाणार आहेत.पुढील काळात फार अडचणी आहेत.यापुढे सोसायटी बिनविरोध होतील,आणि त्या भक्कम राहतील,असे प्रयत्न करावेत.

व्हॉईस चेअरमन प्रकाश सावंत म्हणाले की ५० वर्षे तालुका खरेदी विक्री संघाला होत आहे.खरेदी विक्री संघाच्या वतीने सोसायटी नवनिर्वाचित चेअरमन व गट सचिवांचे सत्कार केले जात आहेत.सोसायटी आणि खरेदी विक्री संघाचे नाते अतूट आहे,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके म्हणाले की सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांच्या मार्गर्शनाखाली आम्ही नव तरुण विकास संस्थांमध्ये काम करत आहोत.मी चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून खत व अन्य प्रकारचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळत आहे.शेतकऱ्यांना हितासाठी खरेदी विक्री संघ व विकास संस्था एकजुटीने काम करत आहेत.त्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खरेदी विक्री संघाच्या पदाधिकारी व अधिकारी,कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीस तालुका विकास संस्थांच्या वतीने शुभेच्या देतो,आणि आमचा सत्कार केलबद्दल आभार व्यक्त करतो. फोंडाघाट सोसायटी चेअरमन श्री.नानचे म्हणाले की खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे.चेअरमन विठ्ठल देसाई व सर्वांचे चांगली सेवा संस्थांना देत आहेत.आमचा सत्कार केल्याबद्दल आम्ही आभार मानतो.

या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व विकास संस्था चेअरमन यांचा शाल, पुष्पगुच्छ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तर विकास संस्था गट सचिवांना भेट वस्तू देत गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक गणेश तावडे, तर आभार व्हाईस चेअरमन प्रकाश सावंत यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!