कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात ‘ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे’ आणि ‘डॉ.राज अहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक’ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धा आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेमध्ये पार पडली.
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते उदघाटन समारंभ पार पडला, या स्पर्धेत जिल्हाभरातुन ३५ स्पर्धक तीन गटांतून निवडण्यात आले होते
गट निहाय विजेते खालील प्रमाणे आहेत.
पहिला गट : ५ वी ते ८ वी – प्रथम – प्राजक्ता अभय ठाकूर देसाई, द्वितीय – धृव विजयकुमार गोसावी, तृतीय – पर्णा पराग नायगावकर, उत्तेजनार्थ – आयुष श्रीरंग भिडे, वेद योगेश बोभाटे, भालचंद्र रवींद्र सावंत
दुसरा गट : (९ वी ते १२ वी)-प्रथम-हर्षदा संदीप सावंत, द्वितीय– श्रुती शरद सावंत, तृतीय– गीता सोपान गवंडे, उत्तेजनार्थ- नुपूर गणेश जोशी, मैत्रेय निलेश पेंडूरकर, ऋतुजा राजन गावडे
तिसरा गट : ( खुला गट)- प्रथम — विनय प्रदीप वझे, द्वितीय– विदिता विनायक जोशी, तृतीय- सलोनी महेश मेस्त्री, उत्तेजनार्थ – रेश्मा ओंकार कासकर, विनायक सिद्धू शिलवंत, संतोष बालाजी पाटील असे या स्पर्धेचे विजेते आहेत.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेट्ये, उपाध्यक्ष मोहन सावंत, संस्थेचे कार्याध्यक्ष आणि डॉ. राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुकचे संस्थापक बुलंद पटेल, संस्थेचे सचिव प्रा. हरिभाऊ भिसे, सहसचिव प्रा. निलेश महेंद्रकर, खजिनदार, सौ.शीतल सावंत, सल्लागार डी. पी.तानावडे , कॉलेजच्या प्राचार्या अर्चना शेखर देसाई, वरवडे सरपंच बांदल, हरकुळ बुद्रुकचे ग्रामसेवक श्री.कवटकर, ट्रस्टचे चेअरमन गणेश घाडीगांवकर, स्वप्नील वर्देकर, भूषण वाडेकर, रमाकांत तेली, हरकुळ बुद्रुक सरपंच गौसिया पटेल, हरकुळ बुद्रुक पोलीस पाटील संतोष तांबे आदी मान्यवर उपस्थित होते .
परीक्षक म्हणून माधव गावकर व ज्ञानदेव एंडे यांनी कामगिरी बजावली. या कार्यक्रम प्रसंगी “महाराष्ट्र आयडॉल “हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल निवेदक राजेश कदम यांचा स्कूलतर्फे सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातुन स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला, स्पर्धेसाठी वादनाची साथ महेश तळगावकर व गणेश चव्हाण यांनी केली, कार्यक्रमाचे निवेदन सहा. शिक्षक हेमंत पाटकर यांनी केले तर आभार संस्थेचे सल्लागार डी. पी. तानवडे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूलचे सांकृतिक विभाग प्रमुख सौ. मोरवेकर ,श्वेता गावडे, श्री.पाताडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.