27.4 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेत महाराष्ट्रात अव्वल..!

- Advertisement -
- Advertisement -

जिल्हा प्रशासनाचे बांद्यात जल्लोषी स्वागत

बांदा | राकेश परब : स्वच्छता क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याने बाजी मारली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्गला पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे.

आपण सर्व जिल्हावासियांमुळेच हा क्रमांक मिळाला असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी बांदा येथे पत्रकार परिषदेत केला. काल दिल्ली येथे पुरस्कार स्विकारल्यानंतर बांदा शहरात श्री नायर व जिल्हा परिषद कर्मचारी यांनी भव्य रॅली काढून ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. या संदर्भात माहिती देण्यासाठी बांदा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री नायर बोलत होते.
२ ऑक्टोबरला विज्ञान भवन, दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात केंद्रिय ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री गिरिराज सिंग, केंद्रिय जलशक्ती मंत्री गजेद्रसिंग शेखावत, केंद्रिय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल, केंद्रिय सचिव स्वच्छता मंत्रालय श्रीमती विनी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य ) राजेंद्र पराडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी , (ग्रामीण) विशाल तनपुरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) विनायक ठाकुर, सावंतवाडीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी सभापती सावी लोके, शर्वणी गावकर, जिल्हा जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, सरपंच अक्रम खान, माजी सभापती शीतल राऊळ, ग्रामविस्तार अधिकारी लीना मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्याला स्वच्छता क्षेत्रात आतापर्यत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याचे खरे श्रेय हे सर्व जिल्हावासियांना तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी , पदाधिकारी, सरपंच, अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, गटसंसाधन केंद्र पाणी व स्वच्छता यांना जाते असे प्रजीत नायर यांनी सांगितले.संपूर्ण देशात प्रथम क्रमांक काही निकशांनी हुकला. मात्र पुढच्या वर्षी याचे आत्मपरीक्षण करून निश्चितच पहिला क्रमांक मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय संघटनानी प्रजित नायर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कट्टा कॉर्नर चौकात रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण बांदा शहरात रॅली काढण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, बाळू सावंत, मकरंद तोरसकर, साई काणेकर, सदस्या स्वप्नाली पवार, किशोरी बांदेकर, रिया आलमेडा, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख संदीप गवस यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

जिल्हा प्रशासनाचे बांद्यात जल्लोषी स्वागत ...

error: Content is protected !!