विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा चे औचित्य साधून भाजपा – वेंगुर्ले व कोकण कला तसेच शिक्षण विकास संस्थेच्यावतीने वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा – मुठ व नवाबाग वाडीतील १५० मच्छीमार कुटुंबांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.
भाजपाच्या वतीने सेवा पंधरवडा मध्ये विवीध सेवाकार्य हाती घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.
सकाळच्या सत्रात उभादांडा – मुठ येथील केपादेवी मंदीरात शिबीराचे आयोजन केले होते, यावेळी केपादेवी देवस्थानचे अध्यक्ष व नगराध्यक्ष राजन गीरप, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन झाले.
तसेच दुपारच्या सत्रात नवाबाग शाळेत शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन झाले.
यावेळी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे, अवंती गवस, प्रदीप पवार, हिंद लॅबचे जिल्हा समन्वयक प्रशांत जाधव, शुभम परब, आशिष परब, शिवराम तवटे इत्यादींच्या टीमने तपासणी केली. या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या ( CBC, HB, LFT, KFT, TFT ( थायराॅईड ) PCR, HBV, HCV ) मोफत केल्या.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका तन्वी रेडकर, शिक्षक रामा पोळजी, तसेच ग्रामस्थ शंकर तारी, श्रीकांत तांडेल, नारायण तारी उपस्थित होते.