आचरा भगवंतगड फाटा ते चिंदर तेरई रस्ता
विवेक परब /आचरा : पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झालेले आहेत, मालवण तालुक्यात काही उत्साही तरुण आपल्या सामाजिक जाणिवेतून अंग मेहणतीने (श्रमदानांने) असे रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे व रस्त्याच्याकडेला वाढलेली झाडी साफ करण्याचे आदर्शवत काम करत आहेत.
आज असेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम आचरा भगवंतगड रस्ता ते चिंदर तेरई असे निखिल माळकर मित्रमंडळाकडून करण्यात आले.
यावेळी निखिल माळकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वै, चिंदर ग्रामपंचायत सदस्य पप्पू परुळेकर व शशीकांत नाटेकर, सागर परुळेकर, स्वप्निल वराडकर, किशोर खोत, विजय माळगांवकर, संतोष घागरे, वैभव साळकर, अक्षय माळकर, गोपाळ लब्दे,दिपक लाड, दिपेश लब्दे, रुपेश परुळेकर, गणेश झोरे हे श्रमदानात सहभागी होते.