हिंदू जनजागृती समितीचे राज्यपालांना निवेदन
उमेश परब / कणकवली : पर्यावरणपूरक असल्याचा गाजावाजा करून कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता; मात्र त्या कागदी लगद्याच्या मूर्ती प्रदूषणकारी असल्याने त्यावर राष्ट्रीय हरित लवादाने वर्ष 2016 मध्ये बंदी घातली होती. तसेच दिनांक 3 मे 2011 च्या शासन निर्णयावर स्थगिती आणली होती. तरीही बाजारात कागदी लगद्याच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यावर प्रतिबंध घातला पाहिजे आणि नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने राज्यपालांकडे केली. यामध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले.