24.1 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

कोविडच्या काळात “वायडब्ल्यूए”चा रक्तदान उपक्रम अत्यंत महत्वाचा : नगराध्यक्ष समीर नलावडे

- Advertisement -
- Advertisement -

युथ वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून कणकवलीत रक्तदान शिबीर संपन्न

उमेश परब / कणकवली : महिलांच्या हाताला काम आणि तरुणांना रोजगार हि आपल्या जिल्ह्याची गरज आहे. आणि याच वर्गाला रोजगारक्षम बनविण्याचे धोरण घेऊन जिल्ह्यात काम करत असलेल्या युथ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने आयोजित केलेला रक्तदान शिबीर सारखा उपक्रम आजच्या कोविडच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे. असे मत कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केले. आगामी काळात संस्थेच्या सर्व उपक्रमात आपला आणि नगरपंचायतीचा सहभाग असेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

युथ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून कणकवली येथे व्ही मॉल या ठिकाणी शनिवारी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, यावेळी नगराध्यक्ष नलावडे बोलत होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार उर्फ बाळासाहेब वळंजू, संस्थेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ वळंजू, सचिव रुपेश घाडी, सह सचिव रऊफ काझी, राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, राष्ट्रवादी कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कणकवलीचे पोलीस पाटील संतोष जाधव, मुथूट फिनकॉर्फ कणकवली शाखेचे व्यवस्थापक गणेश मंडलिक, संदेश मयेकर उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे असलेल्या खात्याच्या माध्यमातून विविध लोकपयोगी योजना गावागावात पोचविण्यासाठी युथ वेल्फेअर असोसिएशन हि संस्था खूप मोठ काम करू शकते. यासाठीलागणारी सर्व मदत आपण नक्कीच करू. कणकवलीच्या विकासासाठी विचार करत असताना संस्थेचे उपक्रम या पुढच्या काळात आम्ही स्वतः पुढाकार घेऊन नगरपंचायतीच्या माध्यमातून आयोजि करू असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार उर्फ बाळासाहेब वळंजू यावेळी बोलताना म्हणाले कि, युथ वेल्फेअर असोसिएशन हि संस्था अध्यक्ष तेजस घाडीगावकर यांच्या नेतृत्वात काम करत असताना जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्याचा जो प्रयत्न करत आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे. जिल्यातील तरुण वर्गात रोजगाराची नवी संधी निर्माण करणारी हि संस्था सामाजिक परिवर्तनातही महत्वाची भूमिका बजावेल. आज रक्तदानासारखी महत्वाची गरज ओळखून संस्थेने राबविलेला उपक्रम सर्वाना मार्गदर्शक ठरणार आहे. असेही ते म्हणाले.

संस्थेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ वळंजू यांनी सर्वांचे आभार मानताना संस्था गावागावात ग्रामसमित्या स्थापन करून ग्रामविकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर शासकीय योजनांचा लाभ, स्वयंरोजगाराच्या संधी, महिलांसाठी गृह उद्योग, तरुणांच्या हाताला काम देताना त्यांच्यातून युवा उद्योजक घडविणे, ग्राम पातळीवरील उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देणे अशा विविध पातळीवर संस्था काम करणार असल्याचे सांगितले.

या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी समृद्धी घाडीगावकर, कोमल काझी, विवेक ताम्हणकर, स्वप्नील वळंजू, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुशील परब, अनिकेत घाडीगावकर, संकेत घाडीगावकर, विराज तावडे, पंडित परब, सुजित तांबे, जिल्हा रुग्णालय ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी योगश गाडेकर, अधिपरिचारिक हेमांगि रणदिवे, किशोर नांदगावकर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सांगली विभागप्रमुख चंद्रशेखर श्रीकांत जगताप आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!