विवेक परब/ चिंदर : किल्ले भगवंतगड येथे श्रमदानाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी देवालय परिसरा लगत वाढलेली छोटी झुडपे तोडून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी दक्षिता आंगणे, ज्योती आंगणे , संकेत परब , भास्कर चिंदरकर , चंदन पडवळ , संतोष नाईक , राज मालोंडकर, मंदार सरजोशी ,दिलीप गोसावी, स्वप्नील गोसावी,प्रणालि तावडे, प्रियांका हिंदळेकर आणि चिंदर व आचरा गावातील रहिवासी सहभागी झाले होते.
- Advertisement -
- Advertisement -