प्रतिनिधी / मसुरे : जि.प.पूर्ण प्राथ शाळा ‘तिवरे खालचीवाडी’ येथे कृतज्ञता बंध व राखी प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. सरपंच सौ.लतिका म्हाडेश्वर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वकौशल्यातून तयार केलेल्या सुंदर व पर्यावरणपूरक राख्या ह्या त्यांच्या कलाकौशल्यास वाव देणा-या असून भविष्यकाळात असे उपक्रम मार्गदर्शक ठरतील.या सर्व विद्यार्थ्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करते.असे मनोगत व्यक्त केले. केंद्रप्रमुख सौ.जुहिली सावंत यांनी या उपक्रमाला ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. तसेच कास्ट्राईब संघटना जिल्हाध्यक्ष श्री.किशोर कदम यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या . या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या राख्या मुलांनी सामाजिक कार्य करणा-या व्यक्तींना बांधण्यात आल्या. तसेच राखी विक्रीतून जी रक्कम मिळाली ती ‘करंजे’ येथील मतिमंद मुलांच्या शाळेस प्रदान करण्यात येईल असे मुख्याध्यापक श्री. विजय शिरसाट यांनी सांगितले.या उपक्रमात कु.गौरव परब,किरण चव्हाण,रिया परब,समीक्षा गोसावी,वैष्णवी सुतार,योगिता पावसकर,समीक्षा चव्हाण,रिया वाळवे ,श्रवण वाळवे या मुलांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. कु.चैतन्य शिरसाट याने तुळशीच्या बिया वापरून तयार केलेली राखी लक्षवेधी ठरली. या कार्यक्रमाला श्री.रघुनाथ चव्हाण,भाई आंबेलकर,संतोष वाळवे,.विजय गोसावी,वेदिका परब,प्रसाद वाळवे,महेश परब,प्रसन्न म्हाडेश्वर,दाजी चव्हाण,संतोष चव्हाण,सौ.वाळवे, शिक्षक श्री,संदीप कदम,विजय मेस्त्री,हेमंत राणे उपस्थित होते.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -