सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तीकडून मदत देणाऱ्यांचे आभार;आमच्या कोविड सेंटरमध्ये एकाचाही मृत्यू नाही…
उमेश परब / कणकवली : कोरोना साथ आटोक्यात येत असल्याने शासनाच्या आदेशानुसार कणकवली नगरपंचायत कोविड केअर सेंटर बंद करण्यात येत आहे.आतापर्यंत ३३६ रुग्णांवर उपचार केले.आमच्या कोविड सेंटर गेल्या साडे तीन महिन्यात एकाचाही मृत्यू झाला नाही.सामाजिक संस्था व उद्योजक, दानशूर व्यक्तीकडून मदत देणाऱ्यांचे आभार व्यक्त करत आहेत.आता तिसरी लाट आल्यास ,शासनाने परवानगी दिल्यास आम्ही पुन्हा कोविड सेंटर चालू करण्याची आमची तयारी आहे,अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,गटनेते संजय कामतेकर,माजी नगराध्यक्षा मेघा गांगण,नगरसेवक अभिजित मुसळे,शिशिर परुळेकर,विराज भोसले, महेश सावंत,किशोर राणे,साटम,अजय गांगण आदी उपस्थित होते.