उमेश परब / कणकवली : भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते सज्ज असतानाच शिवसेनेच्या वतीने आगळंवेगळं आंदोलन सुरू झाले आहे. शिवसेना शाखेसमोर एल इ डी स्क्रीन लावत त्यावर यापूर्वी किरीट सोमय्या यांनी नारायण राणे व राणे कुटुंबियांवर केलेल्या आरोपांचा लेखाजोखा दाखवण्यात येत आहे. शिवसेना शाखेत शिवसेना कार्यकर्त्यांसोबत आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक आदींसह पदाधिकारी उपस्थित आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -