भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस संदिप मेस्त्री यांनी सार्व. बांध. विभागाचे वेधले लक्ष
उमेश परब /कणकवली : कणकवली आचरा या मार्गावरील वाढलेली झाडी तोडण्यासाठी संदिप मेस्त्री यांनी आज सार्व. बांध. विभागाचे लक्ष वेधले. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कणकवली आचरा मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडींची वाढ झालेली आहे. त्यामुळे स्थानिकांना रात्री रस्त्यावरून चालणेही मुश्किल झालेले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी सदर रस्त्याच्या बाजूला असलेली झाडी तोडण्यात यावी व ग्रास कटिंग करण्यात यावे, अशी मागणी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस संदिप मेस्त्री यांनी सार्व. बांध. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना तसेच जि. प. बांधकाम उपअभियंत्यांना निवेदनाद्वारे केली आहे.