मालवणच्या कन्याशाळेत होणार होता कार्यक्रम.
मालवण | सुयोग पंडित : एस.सी -एस.टी. उद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे असे भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर व उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी घोषीत केले आहे.
लवकरच प्रसारमाध्यमांमधून नवीन तारखेची घोषणा केली जाईल असेही विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे सर्वांना कळविले आहे. मार्गदर्शन कार्यक्रम अतिशय नाईलाजाने पुढे ढकलावा लागतोय तरी संबंधीत सर्व व्यक्ती व घटक सहकार्य करतील अशी आशा उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी व्यक्त केली आहे.