वैभव माणगावकर / मालवण : मालवण तालुक्यातील कुपेरी घाटीत मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास चिरे वाहतूक करणाऱ्या १२ टायरचा ट्रक (एपी-२१ टीडब्ल्यू ९६५२) चा अपघात घडला ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला. ट्रक चालक मेगप्पा चव्हाण याला गंभीर भूकंपात झाली आहे. कुपेरी घाटीच्या पायथ्याशी असलेल्या कुणकावळे ग्रामपंचायत लगत २०० मिटर वळणाच्या उतारावर चालकाने ट्रक थांबवण्याचे जोरदार प्रयत्न केले मात्र १००० चिरे भरलेला असल्याने ट्रक चालकाला ट्रॅक वरील ताबा सुटला व थांबत नसल्याने अखेर चालकाने प्रसंगावधान दाखवत रस्त्याच्या बाजुला असलेल्या आब्यांच्या झाडाला जोरदार धडक दिली यात ट्रक पलटी झाला यात ट्रकचा मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच चालकास गंभीर दुखापत झाली आहे. तसेच क्लिनरला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत त्या दोघांना रुग्णालयात हलविले.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -