ओंकार चव्हाण /पोईप : गणेश उत्सव काही दिवसांवर आल्याने विघ्नहर्ता गणपती आगमना पूर्वी येणाऱ्या चाकरमानी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची स्थानिक ग्रामस्थ यांनी दक्षता घेत मालोंड येथील रस्त्याच्या कडेला मोठ मोठी झाडी, गवत,लाजरी भंयकर वाढली होती मालोंड मुख्यरस्ता ते गणपती विसर्जन मार्ग गडनदीतरया मार्गावरील सर्व रस्ते गणपती आगमनापुर्वी साफ सफाई करण्याचा निश्चय मालोंड येथील ग्रामस्थांनी कोणतीही अपेक्षा न करता रस्त्याची साफ सफाई केली आहे.
यावेळी तरूण उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष फटु नारायण घाडीगांवकर, अर्जुन घाडीगांवकर, रविकांत घाडीगांवकर, बाळा परब, कमलाकर सुर्वे ,राकेश भाऊ घाडीगावकर ,पद्याकर फणसगावकर,बाळा पारकर,वेंदान्त मुणगेकर,लक्ष्मण घाडीगावकर यांनी विशेष मेहणत घेऊण ग्राम स्वच्छता अभियान राबवले आहे मालोंड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.