भरड बाजारपेठ मित्रमंडळाची दहीहंडी यंदाही शांततापूर्ण…
वैभव माणगांवकर / मालवण : शहरातील भरड बाजारपेठ भागातील वार्षिक प्रसिद्ध दहीहंडी उत्सवावर शासनाने घातलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधाचे पालन करून यंदा हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
दरवर्षी या उत्सवामध्ये विविध कार्यक्रम, खेळ व स्पर्धा घेऊन फोडली जाते, परंतु यावर्षीच्या कोरोनाच्या निर्बंधांमुळे दहीहंडी बांधण्यास परवानगी नसल्याने भरड बाजार पेठ मित्रमंडळाने अतिशय साध्या पद्धतीने मंदीरामध्ये दहीहंडी बांधून लहान मुलांकडून हंडी फोडण्यात आली. यावेळी सर्व भरड बाजारपेठ मित्रमंडळाचे बालगोपाळ तसेच महिलाही उपस्थित होत्या, तसेच सोशल डिस्टनिंगचा नियम काटेकोरपणे पाळत सर्व निर्बंधांची अंमलबजावणी करत हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.