संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा क्र,. ३ कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उज्ज्वल असे यश संपादन केले आहे. नुकतेच खारेपाटण हायस्कूल येथे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. यामध्ये शाळा कणकवली क्रमांक तीनच्या संतोषी सुशांत आळवे व भालचंद्र रवींद्र सावंत या विद्यार्थ्यांनी माझे शेत सुरक्षित शेत ही प्रतिकृती सादर केली होती या प्रतिकृतीचा विद्यार्थी प्रतिकृती इयत्ता सहावी ते आठवी गटात द्वितीय क्रमांक आला त्यांना शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीमती प्रतिभा खंडेराव कोतवाल यांचे मार्गदर्शन लाभले विज्ञान नाट्योत्सव २०२२ -२३ यामध्ये शाळा कणकवली क्रमांक तीन ने स्वच्छतेतून समृद्धीकडे ही नाटिका सादर केली या नाटिकेचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक तर जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक आला त्याचबरोबर शाळा कणकवली क्रमांक तीन चे उपशिक्षक लक्ष्मण मधुकर पावसकर यांचा शिक्षक प्रतिकृती प्राथमिक गटात तृतीय क्रमांक आला त्यांनी विज्ञान या विषयातील स्वच्छता आणि आरोग्य ही प्रतिकृती सादर केली होती.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा वामन करंबेळकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र सावंत उपाध्यक्ष सौ सायली राणे सदस्य सौ. साक्षी आळवे व इतर सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे शाळेने मिळवलेल्या भरघोस यशाबद्दल विद्यार्थ्यांचे पालक वर्गाकडून विशेष कौतुक होत आहे.