भारतात तब्बल ७२ वर्षांनी ‘चित्ता’थरार…!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : स्वतंत्र भारतात १९५२ साली शेवटचा जंगली चित्ता मध्ये आंध्रप्रदेशात दिसला होता. राजस्थान व मध्य प्रदेशातही सन १९५२ साली चित्ता शेवटचा दिसला असे तज्ञ सांगतात मात्र यानंतर भारतात जंगली चित्ता दिसल्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे भारतातून चित्ता नामशेष झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात चित्ता होता अशा नोंदी आढळून येतात.
आता तब्बल ७२ वर्षांनंतर म्हणजे १७ सप्टेंबर२०२२ रोजी नामिबिया देशातून चित्ताला भारतात आणले जाणार आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक वनीकरण विभागाने या इव्हेंटची जोरदार तयार चालविली आहे. कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, कासार्डे येथील विद्यार्थ्यांना यासंदर्भात जनजागृती होण्यासाठी खारेपाटण व फोंडाघाट विभागाचे वनपाल श्री. शिवाजी इंदूलकर यांनी विद्यार्थ्यांना चित्त्याचे महत्व, चित्ता आगमन मोहिमेचे वैशिष्ट्ये, यासंदर्भात माहिती दिली.
हा कार्यक्रम राष्ट्रीय हरित सेना कासार्डे व सामाजिक वनीकरण विभाग खारेपाटण – फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.स्वागत व आभार विभागप्रमुख अनंत काणेकर यांनी केले.याप्रसंगी खारेपाटण-फोडाघाटचे वनपाल शिवाजी इंदूलकर, विद्यालयाचे पर्यवेक्षक नारायण कुचेकर, राष्ट्रीय हरित सेनेचे विभाग प्रमुख अनंत काणेकर,विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व पत्रकार दत्तात्रय मार्कंड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यवेक्षक एन्.सी. कूचेकर म्हणाले की,आफ्रिकेतील नामिबिया देशातून हा चित्ता भारतात आणला जाणार आहे. हल्ली बिबट्या सारखा दिसत असला तरी तो आफ्रिकन चित्ता नव्हे असेही कुचेकर म्हणाले.
एकेकाळी अख्ख्या भारतात १८०० चित्ते होते. मात्र, ते शिकारीमुळे सन १९५२ पर्यंत सर्वच नामशेष झाले. चित्ते सध्या अलगेरिया, अंगोला, बेनिन, आफ्रिका, इराण, केनिया, नामिबीया, निमर, टांझानिया, युगांडा, झिम्बाब्वे अशा १७ देशांत आढळतात. हल्ली ही संख्या ७ हजार आहे. चित्त्यासाठी भारतातील मध्य प्रदेश व राजस्थान हा भाग विशेष आहे.१९५२मध्ये शेवटचा चित्ता नष्ट झाल्याचे
केंद्रशासनाने घोषित केले. त्यानंतर भारतात चित्तानेची जोरदार प्रयत्न झाले सर्वोच्च न्यायालयाने सन 2020 मध्ये आफ्रिकन चित्ता भारतात आणण्याची परवानगी दिली. आता दोन वर्षानंतर आफ्रिकन चित्ता मध्य प्रदेशातील राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प ‘कुनो’ मध्ये आणून सोडण्यात येणार आहे. भारतात एकदा का हा चित्ता रमला की त्यांची संख्या वाढीस वेळ लागणार नाही, हे मात्र निश्चित.
केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्त्याबाबत शाळा, महाविद्यालयात पोस्टर, जनजागृती केली जाणार जात आहे. चित्त्याचा इतिहास, भारतातील जुने वास्तव आदी माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. त्याअनुषंगाने वनं विभागाने ही जनजागृती मोहिम हाती घेतली आहे.चित्ता हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ प्रमाणे अनुसूची १ मध्ये मोडतो. त्याच्या अंगावर सरळ, गोल काळे ठिपके असतात, जे बिबट्यापेक्षा वेगळे दिसतात. चित्ता हा जगातला सर्वाधिक वेगवान प्राणी असून तो प्रति ताशी ११३ किमी अंतर धाऊ शकतो. वजन केवळ ५५ते६३ किलो असते. त्याची मान बारीक असून शरीराची रचना एखाद्या आधुनिक बाईकप्रमाणे आहे. तो जंगलात साधारणत: १३ वर्षे जगू शकतो.जगात चित्यांचे एकुण ३६ प्रकार आढळतात.तो
गवताळ प्रदेशात तो चांगला रमतो.असा गुणवैशिष्ट्ये असलेला दुर्मिळ वन्यप्राणी वाचण्यासाठी चित्त्याच्या भागापासून बनलेली वस्तु खरेदी करू नये असे आवाहन याप्रसंगी श्री.नारायण कुचेकर यांनी विद्यार्थ्यांना केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधान उपस्थित मान्यवर व वनपाल श्री. इंदुलकर यांनी केले. वन व पर्यावरण तज्ञ आता भारतातील जैवसाखळीत चित्ता नसल्याची चिंता दूर होईल असा कयास धरुन आहेत.