विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याल्या आजगांव येथील ‘आजगांव साहित्य प्रेरणा कट्ट्याची’ तेविसावी मासिक सभा रविवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आजगांव वाचनालयात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय जयवंत दळवीं विषयी विशेष कार्यक्रम होणार आहे. साहित्यिक जयवंत दळवी यांचे मूळगाव आरवली ( ता.वेंगुर्ला) असून त्यांचा जन्म ऑगस्ट महिन्यात झाला होता तर निधन सप्टेंबर महिन्याच्या १६ तारखेला झाले होते. या अनुषंगाने आजगांव साहित्य कट्ट्यावर या सप्टेंबर महिन्यात त्यांचे पुण्यस्मरण करण्याचे ठरविण्यात आले आहे. या कार्यक्रमात पत्रकार अनिल निखार्गे हे दळवीं विषयीच्या आठवणी सांगतील, तर शिक्षक ईश्वर थडके सर त्यांच्या साहित्याविषयी बोलतील. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आणि चर्चा करणेसाठी सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -