वैभव माणगांवकर / मालवण : गेल्या आठ दिवसांपासून अचानक वारा दक्षिणेकडून वाहत असल्याने किनार्यालगत येणारी मासळी अचानक गायब झाली आहे. त्यामुळे मच्छीमारांना मध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले दिसत आहे. मुंबई मासेमारीच्या सुरुवातीला ऑगस्ट महिन्यात उत्तरेकडून हळुवारपणे वाहणारे वारे मासेमारीला पोषक असतात असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. मच्छीमारांसाठी हा हंगाम फार महत्वाचा असतो कारण यावेळी किनार्यालगत भरपूर मासळी असते. हवामान बदलामुळे गेला आठवडाभर मासेमारीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे पाच-सहा दिवसांपुर्वी हिंदी महासागरानजिक इंडोनेशिया जवळ समुद्रात भूकंप झाल्याचे समजतेय. तेथे समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचेही सांगितले जात आहे. तेव्हापासून या वातावरणात बदल झाल्याचे जाणवते वाऱ्याने दिशा बदलली आहे आणि दक्षिणेकडून वारा वाहतोय सोबतच पाण्याचा प्रवाह देखील दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेला आहे. त्यामुळे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे परिणामी माशांचे भाव पुन्हा कडाडले आहेत. सध्या अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. असे मच्छीमारांकडून समजत आहे. या दिवसांमध्ये समुद्राच्या पाण्याला शेळ लागते ही शेळ १० ते १६ ऑगस्ट यादरम्यान जाणवली पण दक्षिणेकडून वारे वाहू लागल्यामुळे हि शेळ जाणवणे बंद झाले या सर्व वातावरण बदलांचे विपरीत परिणाम मासेमारीवर होत आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -