ब्युरो न्यूज / मुंबई : राज्यात काही दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठाणे पालघर सह राज्यातील काही जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईच्या काही जिल्ह्यांना यलो कलर चा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने राज्यात विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार छत्तीसगड वर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पूर्व-पश्चिमेकडून वारे वाहत असल्याचा परिणाम जाणवणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -