आमदार नितेश राणेंनी घेतली दखल.
बांदा | राकेश परब : प्रभू श्री रामांचे विडंबन करणाऱ्या कापुर कंपनीच्या जाहीराती विरोधात बांद्यातील रामभक्तांनी गेले वर्षभर सुरु ठेवलेल्या त्याग आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी घेतली आहे. बांदा सरपंच अक्रम खान यांनी कणकवली येथे आमदार राणे यांची भेट घेऊन त्यांना या त्याग आंदोलनाची संपूर्ण माहीती दिली.बांद्यातील ग्रामस्थांनी सुरु केलेल्या या आंदोलनाचा आमदार नितेश राणेंना हा विषय समजताच त्यांनी त्याग आंदोलनाचे प्रणेते आशुतोष भांगले यांच्या कडून याबाबत ची माहिती घेतली. बांद्यातील या विषय़ाबाबत आपण विधानसभेत विषय़ मांडणारच आहे.तसेच आमदार नितेश राणे यांनी बांदा येथे जाऊन आशुतोष भांगले व ग्रामस्थ यांना बांद्या येथे भेटणार असल्याचे सांगितले. देवाची थट्टा करणाऱ्या या कापुर कंपनीच्या विरोधात बांद्यात गेले वर्षभर त्याग आंदोलन सुरु आहे. बांद्यात पत्रकार तथा श्री विठ्ठल मंदिराचे सेवक आशुतोष भांगले यांनी गेल्यावर्षी बातमी तसेच सोशल मिडिया द्वारे हे त्याग आंदोलन सुरु केले.त्यांनी स्वत: या कापुराचा वापर बंद केला. मागणी केवळ एकच होती ती जाहिरात व जाहिर माफी मागावी.पुढे हे आंदोलन सूरू ठेवले.
ती जाहिरात टीव्हीवर कमी झाली पण य़ुट्यबर सुरु आहे . कंपनीने अद्याप जाहिर माफी मागितलेली नाही.सोशल मिडियावर ते जाहीर आवाहन ऐकून बांदा सरपंच अक्रम खान यांनी बांदावासियांचा हा विषय आपले नेते आमदार नितेश राणे यांच्यासमोर मांडला व बांद्यातील त्याग आंदोलनाचे व्हिडिओ दाखवले.आमदार नितेश राणे यांनी य़ाची तात्काळ दखल घेतली.तसेच यावर कारवाईचे आश्वासन दिले.