- तब्बल एका महिन्यात ४पाळीव कुत्र्याचा फडशा
- कळसुली ग्रामस्थ भीतीच्या छायेत
उमेश परब / कणकवली : कणकवली तालुक्यातील कळसुली सुद्रीकवाडी,दिडवणेवाडी येथे वारंवार बिबट्याने रात्रीच्या वेळी ४ पाळीव कुत्र्याचा फडशा पडला असून,रविवारी पहाटे ३च्या नंदकिशोर सुद्रीक सुद्रीकवाडी यांच्या घराकडील पाळीव कुत्र्याला ठार मारले,असल्याने कळसुली गावांत बिबट्या वावर वाढत दिवसेंदिवस वाढतच असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहे. कळसुली गावांतचं बिबट्याचा वावर? वाढला काय यामागची कारणे आहेत. असा प्रश्न ग्रामस्थांनमधून केला जात आहे.
या कडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष वेधून या बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी कळसुली गावातील ग्रामस्थांन मधून जोर धरत आहे.