विवेक परब / आचरा : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरन सी. एस्. आर निधीतून, जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरजू मुलींना ज्ञानदिप विद्यालय वायंगणी येथील पाच मुलींना परिवर्तन केंद्र जिल्हा समन्वयक विलासजी हडकर यांच्या हस्ते मोफत सायकल वितरण करण्यात आले.
यावेळी परिवर्तन केंद्र जिल्हा समन्वयक विलास हडकर यांनी मुलांना सायकल बँक संकल्पना, बौद्धिक, शारीरिक विकास, लोप पावत चाललेली संस्कृती या बाबत बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक टकले सर, समिर बांवकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वै, बांवकर मँडम, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे उमेश सावंत, रावजी सावंत, पालक, शिक्षकवृंद हे मान्यवर उपस्थित होते. प्रशालेतील विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करुन देण्यासाठी जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्याकडे भारतीय जनता पार्टी जिल्हास्तरीय नेते समिर बांवकर यांनी पाठपुरावा केला होता.