तीस ऑगस्ट
१५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.
१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
१८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.
१९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.
१९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड – कुमेन – मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
१८१३: बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा जन्म.
१८५०: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म.
१८७१: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा जन्म.
१८८३: योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचा जन्म.
१९०३: हिंदी कथाकार, कादबंरीकार, कवी भगवतीचरण वर्मा यांचा जन्म.