मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
जिल्हा परिषद शाळा ओसरगांव नंबर १ यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन प्रकट महाराष्ट्र या साप्ताहिकाने महाराष्ट्र रक्षक पुरस्कार देऊन शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम यांना सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन कणकवली येथे सन्मानित केले.यावेळी तहसीलदार रमेश पवार, कणकवलीचे पीएसआय सचिन हुंदळेकर, तसेच विद्याधर राणे, ट्रेड युनियन नेते जेष्ठ पत्रकार अंधारी, संपादक दत्तराम दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
सन 2021 / 2022 या वर्षांमध्ये कोरोना कालावधीत केलेले काम तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विलास परब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ साहित्यिक कवी अजय कांडर यांची शाळेतील मुलांनी घेतलेली मुलाखत , सिने अभिनेत्री अक्षता कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चला सुसंवाद घडवूया महिला मेळावा आयोजित केला होता. तसेच राज्यस्तरीय निबंध आणि कविता लेखन स्पर्धेमध्ये मुलांनी चांगल्या प्रकारचे सुयश प्राप्त केलं.
शाळेतील मुलांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या उपस्थितीत देशभक्तीपर नृत्य सादर करून स्वागत केले.असे विविधरंगी उपक्रम शताब्दी महोत्सवां नंतर शाळेने राबविले होते. शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम, राजश्री तांबे विलिस चोडणेकर, मोडक यांचे शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले. या शाळेच्या यशामध्ये सर्व विद्यार्थी ,शिक्षक, पालक शाळा व्यवस्थापन समिती, व माजी विद्यार्थी संघ यांचे मोलाचे योगदान आहे असे मुख्याध्यापक किशोर कदम म्हणाले.