सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा तोच उत्साह कायम.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
गेली दोन वर्षे सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात हा उत्साह थोडा मंदावलेला पण राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने सर्व प्रथम हिंदू सणावर जे आजपर्यंत निर्बंध लावलेलं ते हटवले आहेत. त्यामुळे आज माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रति वर्षाप्रमाणे स्थापन होणारा कुडाळ पोस्ट ऑफिस समोर सिंधुदुर्ग राजाचे ढोल ताश्याच्या गजरात आज पिंगुळी येथील माडये गणेश मुर्ती कला केंद्र इथून, पिंगुळी म्हापसेकर तिठा, गवळदेव, पोलीस स्टेशन मार्गे सिंधुदुर्ग राजाचे सभामंडपात आगमन झाले आहे. त्यावेळी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांचा तोच उत्साह पाहायला मिळाला आहे.
यावेळी ता. अध्यक्ष विनायक राणे, युवा नेते आनंद शिरवलकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक निलेश परब, सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान विश्वस्त राकेश नेमळेकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका कु चांदणी कांबळी, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, साईनाथ म्हाडदळकर, मंगेश चव्हाण, सौ.साधना माडये, चंदन कांबळी, राजवीर पाटील, नागेश नेमळेकर, साईराज दळवी, अनुप जाधव, देवराज राणे, अक्षय बाईत, संदेश सुकळवाडकर, आनंद सूर्यवंशी, चिन्मय नेमळेकर, विनायक घाडी, प्रसन्न गंगावणे, सागर वालावकर तसेच फोटोग्राफर अजय कुडाळकर,अनिकेत पानवलकर आदी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.