वायंगणी गावात प्राप्तीच्या घरी जाऊन आमदार वैभव नाईक यांनी घेतली भेट.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वायंगणी येथील कु. प्राप्ती रेडकर हिला नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेत राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाल्याबद्दल तिच्या निवासस्थानी जाऊन सन्मानित केले.
आमदार वैभव नाईक यांनी कु.प्राप्ती हिच्या पालकांचेही अभिनंदन करुन रेडकर कुटुंबियांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कु.प्राप्ती ही वायंगणी सरपंच सौ.संजना रेडकर यांची कन्या असून तिचे गावातही सर्वांनी जल्लोषात स्वागत केले होते.