27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ट्रॅव्हलगंगा आणि विमानाचा तलाव..! ( विशेष)

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरु होऊन दहा महिने पूर्ण झालेत. या दहा महिन्यात चार मोठे सण,दोन मोठ्या जत्रा,तीन दीर्घ सुट्ट्या येऊन गेल्यात. या सर्वात एक गोष्ट लक्षात येते की गेली दहा वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्यांच्या हवाई सफरीची जी हवा झाली होती तिचा एकही ढग सणासुदीला सामान्यांसाठी ‘कृपा वर्षाव’ करताना दिसलेला नाही.

विमानसेवा सुरु होण्यापूर्वी जे हवाई स्वप्न सामान्य सिंधुदुर्ग वासिय व मुंबईस्थित चाकरमान्यांना पडत होते ते स्वप्न आजही ‘पडलेलेच’ जाणवते.
विमानसेवा सुरु झाल्यावर हौस म्हणून मुंबईला विमानाने जाणारे आणि फोटो काढणारे सुद्धा आज पुन्हा काही काम आलेच तर विमानाने जाताना आढळत नाहीत.
मालवण तालुक्याचा विचार करता मालवण तालुक्यातील प्रवासी हा आजही ट्रॅव्हल किंवा खाजखी आराम गाड्यांनाच प्राधान्य देतो. रेल्वे ही दुसरी पसंती असते.

महामार्गावर खड्ड्यांची रांगोळी,प्रवासाला लागणारा जादाचा वेळ आणि इतर दगदगीविषयी चरफड करतच का होईना सामान्य जिल्हावासीय व मालवण तालुकावासीय रस्तेमार्गावरुन येणार्या लक्झरी व ट्रॅव्हल्सनाच प्राधान्य देतात.

विमानसेवा सुरु होण्यापूर्वी जे वाजवी तिकीट दरांचे गाजर दाखविले गेले होते त्याचा आज मागमूसही दिसत नाही. पर्यटकांचा ओढासुद्धा विमानाच्या प्रवासाकडे म्हणावा तितका नाही. दिवसभर विमानं चालू राहतील, चाकरमानी अगदी रेल्वे व एस.टी.सारखे विमान प्रवासात एकमेकांसोबत गजाली मारत गांवाला येतील वगैरे अनेक कल्पना या आज खरेच कल्पना होत्या हे स्पष्ट झाले आहे.

या सर्वात एक मुद्दा महत्वाचा आहे की तुरळक एस टी बसेस सोडल्या मुंबई ते सिंधुदुर्ग येणारे व जाणारे नव्वद टक्के प्रवासी खासगी आराम गाड्यांना प्राधान्य देतात. एकतर खासगी आराम गाडी थेट गावात जाते किंवा गावच्या फाट्यापर्यंत तरी जातेच जाते . बहुतांश युवा चाकरमानी वर्गाला रजा व सुट्टीची शाश्वती नसते..म्हणजे नेमकी तारीख ठरलेली नसते तो युवा वर्ग रेल्वेतील जनरल डब्यापेक्षाही खासगी आराम गाडीला प्राधान्य देतो. मुंबईतून ओबेरॉय माॅल, पुरेल,एलफिस्टन ऐश्वर्या हाॅटेल, ठाण्यात तीन हात नाका वगैरेसारख्या ठिकाणी आल्यानंतर गावाकडे यायची आपली शंभर टक्के खात्रीची एकतरी खासगी बस हमखास असतेच हा विश्वास ट्रॅव्हल सेवा देणार्यांनी निर्माण केला आहे हे मान्य करावेच लागेल.

विमानाचे गाजर व ‘कोकण’ रेल्वेच्या नावाखाली दाक्षिणात्यांचे आरक्षण जास्त होणार्या रेल्वेपेक्षा खात्रीशीर असणारी ट्रॅव्हल्स सेवा हे काही तुरळक अपवाद वगळता अतिशय शिस्तबद्ध व्यावसायिक पणे आपले काम करतात.

उदाहरण म्हणून मालवण तालुक्यातील आचरा येथील शिवरामेश्वर ट्रॅव्हल ही सेवा..! दर तीन वर्षांनी बदलणार्या गाड्या,उत्तम नियोजन, कणकवलीच्या आतून दुर्गम भागातून आचरा व मालवणपर्यंत प्रवाश्यांना सोयीस्कर होईल असा आखलेला मार्ग अशा विविध पैलूंनी अशा ट्रॅव्हल्स प्रवाशांच्या स्वप्नात नाही तर वास्तवात घर करुन रहातात.

मालवण मधील पारिजात, जगदंबा, विशाल, गणेश कृपा ,मुज़ावर अशा इतर अनेक ट्रॅव्हल्सनेही तसे आपले स्थान सामान्य नागरीकांच्या मनात निर्माण केले आहे.

शिवरामेश्वर ट्रॅव्हल्सचे संचालक व मालक श्री. गिरीश बाणे यांच्याशी नुकताच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलने संपर्क साधला आणि एकंदर सध्याच्या ट्रॅव्हल्सच्या स्थितीविषयी विचारपुस केली असता श्री. गिरीश बाणे यांनी स्वतःच्या व्यवसायाबद्दल समाधान व्यक्त केले आणि सोबतच हा व्यवसाय विश्वासपात्र बनविण्यासाठी त्यांची मेहनतही सांगितली. गाड्यांची देखभाल, प्रवाशांची सोय आणि न कुरकुरता नियमीत सेवा द्यायची मानसीकता यावर थोडक्यात त्यांचे प्रयत्न सांगितले.

एकंदरच आजतरी सामान्य सिंधुदुर्गवासियांसाठी ‘ट्रॅव्हलगंगा’ हीच खरी खुरी मुक्कामी सुरक्षितपणाने नेऊ शकणारी विश्वासाची शाही नदी आहे…जिच्यासमोर विमानसेवा ही तसा ‘सुकलेला तलावच’ आहे.
विमानातून आणिबाणीला जाणायेणारे असतीलही परंतु सामान्य स्थितीत विमान प्रवास हा जितका भासवला गेलेला तितका सामान्य नक्कीच नाही.

ट्रॅव्हलसेवा देणार्यांच्या संख्येत मोसमा प्रमाणे वाढ व घट होत असतेच परंतु जसे शिवरामेश्वर ट्रॅव्हल्सचे संचालक व मालक गिरीश बाणे यांनी सांगितले त्याप्रमाणे नियमिततेचा ध्यास धरला तर रस्ता,खड्डे याहीपेक्षा ‘ट्रॅव्हलगंगा’ अथक चालू ठेवणे हेच कर्तव्य आणि समाधान असते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशोत्सव ही चाकरमान्यांची हळवी बाजू सांभाळून सेवा देणार्या या ट्रॅव्हलगंगेला उत्तम रस्त्यांचे सुख मिळाले की तो प्रवास आणखीन सुखकर होईलच.

सुयोग पंडित ( मुख्य संपादक| आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरु होऊन दहा महिने पूर्ण झालेत. या दहा महिन्यात चार मोठे सण,दोन मोठ्या जत्रा,तीन दीर्घ सुट्ट्या येऊन गेल्यात. या सर्वात एक गोष्ट लक्षात येते की गेली दहा वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्यांच्या हवाई सफरीची जी हवा झाली होती तिचा एकही ढग सणासुदीला सामान्यांसाठी 'कृपा वर्षाव' करताना दिसलेला नाही.

विमानसेवा सुरु होण्यापूर्वी जे हवाई स्वप्न सामान्य सिंधुदुर्ग वासिय व मुंबईस्थित चाकरमान्यांना पडत होते ते स्वप्न आजही 'पडलेलेच' जाणवते.
विमानसेवा सुरु झाल्यावर हौस म्हणून मुंबईला विमानाने जाणारे आणि फोटो काढणारे सुद्धा आज पुन्हा काही काम आलेच तर विमानाने जाताना आढळत नाहीत.
मालवण तालुक्याचा विचार करता मालवण तालुक्यातील प्रवासी हा आजही ट्रॅव्हल किंवा खाजखी आराम गाड्यांनाच प्राधान्य देतो. रेल्वे ही दुसरी पसंती असते.

महामार्गावर खड्ड्यांची रांगोळी,प्रवासाला लागणारा जादाचा वेळ आणि इतर दगदगीविषयी चरफड करतच का होईना सामान्य जिल्हावासीय व मालवण तालुकावासीय रस्तेमार्गावरुन येणार्या लक्झरी व ट्रॅव्हल्सनाच प्राधान्य देतात.

विमानसेवा सुरु होण्यापूर्वी जे वाजवी तिकीट दरांचे गाजर दाखविले गेले होते त्याचा आज मागमूसही दिसत नाही. पर्यटकांचा ओढासुद्धा विमानाच्या प्रवासाकडे म्हणावा तितका नाही. दिवसभर विमानं चालू राहतील, चाकरमानी अगदी रेल्वे व एस.टी.सारखे विमान प्रवासात एकमेकांसोबत गजाली मारत गांवाला येतील वगैरे अनेक कल्पना या आज खरेच कल्पना होत्या हे स्पष्ट झाले आहे.

या सर्वात एक मुद्दा महत्वाचा आहे की तुरळक एस टी बसेस सोडल्या मुंबई ते सिंधुदुर्ग येणारे व जाणारे नव्वद टक्के प्रवासी खासगी आराम गाड्यांना प्राधान्य देतात. एकतर खासगी आराम गाडी थेट गावात जाते किंवा गावच्या फाट्यापर्यंत तरी जातेच जाते . बहुतांश युवा चाकरमानी वर्गाला रजा व सुट्टीची शाश्वती नसते..म्हणजे नेमकी तारीख ठरलेली नसते तो युवा वर्ग रेल्वेतील जनरल डब्यापेक्षाही खासगी आराम गाडीला प्राधान्य देतो. मुंबईतून ओबेरॉय माॅल, पुरेल,एलफिस्टन ऐश्वर्या हाॅटेल, ठाण्यात तीन हात नाका वगैरेसारख्या ठिकाणी आल्यानंतर गावाकडे यायची आपली शंभर टक्के खात्रीची एकतरी खासगी बस हमखास असतेच हा विश्वास ट्रॅव्हल सेवा देणार्यांनी निर्माण केला आहे हे मान्य करावेच लागेल.

विमानाचे गाजर व 'कोकण' रेल्वेच्या नावाखाली दाक्षिणात्यांचे आरक्षण जास्त होणार्या रेल्वेपेक्षा खात्रीशीर असणारी ट्रॅव्हल्स सेवा हे काही तुरळक अपवाद वगळता अतिशय शिस्तबद्ध व्यावसायिक पणे आपले काम करतात.

उदाहरण म्हणून मालवण तालुक्यातील आचरा येथील शिवरामेश्वर ट्रॅव्हल ही सेवा..! दर तीन वर्षांनी बदलणार्या गाड्या,उत्तम नियोजन, कणकवलीच्या आतून दुर्गम भागातून आचरा व मालवणपर्यंत प्रवाश्यांना सोयीस्कर होईल असा आखलेला मार्ग अशा विविध पैलूंनी अशा ट्रॅव्हल्स प्रवाशांच्या स्वप्नात नाही तर वास्तवात घर करुन रहातात.

मालवण मधील पारिजात, जगदंबा, विशाल, गणेश कृपा ,मुज़ावर अशा इतर अनेक ट्रॅव्हल्सनेही तसे आपले स्थान सामान्य नागरीकांच्या मनात निर्माण केले आहे.

शिवरामेश्वर ट्रॅव्हल्सचे संचालक व मालक श्री. गिरीश बाणे यांच्याशी नुकताच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलने संपर्क साधला आणि एकंदर सध्याच्या ट्रॅव्हल्सच्या स्थितीविषयी विचारपुस केली असता श्री. गिरीश बाणे यांनी स्वतःच्या व्यवसायाबद्दल समाधान व्यक्त केले आणि सोबतच हा व्यवसाय विश्वासपात्र बनविण्यासाठी त्यांची मेहनतही सांगितली. गाड्यांची देखभाल, प्रवाशांची सोय आणि न कुरकुरता नियमीत सेवा द्यायची मानसीकता यावर थोडक्यात त्यांचे प्रयत्न सांगितले.

एकंदरच आजतरी सामान्य सिंधुदुर्गवासियांसाठी 'ट्रॅव्हलगंगा' हीच खरी खुरी मुक्कामी सुरक्षितपणाने नेऊ शकणारी विश्वासाची शाही नदी आहे…जिच्यासमोर विमानसेवा ही तसा 'सुकलेला तलावच' आहे.
विमानातून आणिबाणीला जाणायेणारे असतीलही परंतु सामान्य स्थितीत विमान प्रवास हा जितका भासवला गेलेला तितका सामान्य नक्कीच नाही.

ट्रॅव्हलसेवा देणार्यांच्या संख्येत मोसमा प्रमाणे वाढ व घट होत असतेच परंतु जसे शिवरामेश्वर ट्रॅव्हल्सचे संचालक व मालक गिरीश बाणे यांनी सांगितले त्याप्रमाणे नियमिततेचा ध्यास धरला तर रस्ता,खड्डे याहीपेक्षा 'ट्रॅव्हलगंगा' अथक चालू ठेवणे हेच कर्तव्य आणि समाधान असते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशोत्सव ही चाकरमान्यांची हळवी बाजू सांभाळून सेवा देणार्या या ट्रॅव्हलगंगेला उत्तम रस्त्यांचे सुख मिळाले की तो प्रवास आणखीन सुखकर होईलच.

सुयोग पंडित ( मुख्य संपादक| आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

error: Content is protected !!