ब्युरो न्यूज /कणकवली : महाराष्ट्र ए्स. टी. कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी हिरेन रेडकर यांची नियुक्ती करण्यात अली आहे. गेली अनेक वर्षे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. सिंधुदुर्गाचे सुपुत्र असलेले रेडकर हे कामगार क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संपुर्ण महाराष्ट्रभर एस्. टी. ने फिरून कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या न्याय हक्कांसाठी ते कायम झगडत आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता गेली अनेक वर्षे जिल्ह्यात बंद असलेली सेना युनियन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होऊन आता जोमाने कार्यरत झाली आहे. या प्रसंगी एस्.टी. कामगार सेनेचे आणि सिंधुदुर्ग युवासेना जिल्हा प्रमुख गितेश कडू यांनी त्यांना फोनद्वारे शुभेच्छा देवून त्यांच्या होवू घातलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यासाठी स्वागतोत्सुक असल्याचे सांगितले.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -