बांदा | राकेश परब :
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे शेकडो गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात येते. त्यात सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, बीड, ठाणे, पुणे अशा अनेक जिल्ह्यात यावर्षीसुद्धा शालेय साहित्य व दप्तर वाटप करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि. प. शाळा मडूरा, जि. प. शाळा पाडलोस, जि. प. शाळा रोणापाल शाळांना आज दप्तर वाटप करण्यात आली.
खेड्यापाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे हे ओळखून दरवर्षी संस्था शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शालेय दप्तर तसेच स्कॉलरशिपचे वाटप करते. आज येथे शालेय दप्तर संच वाटप केल्याबद्दल रोणापाल गावचे सरपंच सुरेश गावडे यांनी आभार मानले.
यावेळी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात प्रवीण परब, विश्वनाथ नाईक, सुरेश गावडे, प्रथमेश सावंत, देव कुबल, निर्जरा परब यांनी सहभाग घेतला. सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.