मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ग्रामपंचायत वरचीगुरामवाडीचे सफाई कामगार सखाराम धोंडी पेंडूरकर यांना ध्वजारोहण करण्याचा बहुमान देण्यात आला.यावेळी सरपंच स्वाती सतीश वाईरकर, सदस्य ऋषी पेणकर, सौ मयुरी कुबल,बॅ नाथ पै सेवांगणचे दीपक भोगटे, बापू तळावडेकर, ग्रामसेवक लक्ष्मण सरमळकर, बाळ महाभोज, किशोर शिरोडकर, ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी चे कर्मचारी श्रीकांत भोजणे, सोनाली भोजणे,संकेत परूळेकर, विराज गोठणकर आदी उपस्थित होते.