25.6 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

शाळा दुरुस्तीच्या निकृष्ट कामाने ग्रामस्थ आक्रमक !

- Advertisement -
- Advertisement -

…तर अधिकारी जबाबदार

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील बांदिवडे मळावाडी प्रशालेच्या सुमारे तीन लाख रुपये खर्चाच्या शाळा दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. सदर काम अपूर्ण अवस्थेत आणि मंजूर निवीदे प्रमाणे करण्यात आलेले नाही.त्यामुळे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्या उपस्थितीत मळावाडी येथे झालेल्या बैठकीत आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी विद्यार्थी शाळा आणि ग्रामस्थ यांना फसवणाऱ्या सदर ठेकेदाराचे कोणत्याही प्रकारचे बिल प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत अदा करू नये. जर हे बिल संबंधित अधिकारी वर्गाने अदा केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अधिकारी वर्गाची राहील. तसेच या प्रशालेचे निकृष्ट पद्धतीने काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला काळया यादीत टाकावे अशीही मागणी संतप्त ग्रामस्थांनी यावेळी केली.
सदर शाळा दुरुस्ती काम या ठेकेदारास मंजूर निविदे प्रमाणे करण्याचे संबंधित ग्रामस्थांनी वेळोवेळी सांगितले होते. परंतु प्रत्येक वेळी संबंधित ठेकेदाराने ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोपही ग्रामस्थांच्या वतीने प्रमोद मयेकर यांनी यावेळी केला. या वेळी संबंधित ठेकेदारासही बोलावून घेण्यात आले होते, परंतु ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरे संबंधित ठेकेदारास देता आली नाहीत. तसेच ग्रामस्थांनी मंजूर नीविदे प्रमाणे काम केले नसल्याने उपस्थित अधिकारी वर्गाकडे नाराजी व्यक्त केली. अर्धवट आणि तकलादू काम संबंधित ठेकेदाराने केल्यामुळे झालेल्या कामाचे कोणत्याही प्रकारचे बिल अदा करू नये तसेच संबंधित ठेकेदारास काळया यादीत टाकावे अशी संतप्त मागणी येथील ग्रामस्थांनी यावेळी केली. जर भविष्यात संबंधित ठेकेदारास कोणत्याही प्रकारचे या कामाचे बिल अदा झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही येथील ग्रामस्थांच्या वतीने प्रमोद मयेकर यांनी दिला.
या वेळी सरपंच सौ. प्रविणा प्रभू, उपसरपंच किरण पवार, प स सदस्य अशोक बागवे,
ग्रामपंचायत सदस्य बबलू मिठबावकर, बांधकाम विभागाचे चौगुले, प्रमोद मयेकर,आशु मयेकर, सुभाष मुणगेकर, दत्ता मिठबावकर,आशिष चेंदवनकर, कुणाल हडकर, विराज मिठबावकर, संतोष मयेकर, लीलाधर मुणगेकर,पोलीस पाटील नरेश मसुरकर, संतोष मुणगेकर, बबन चौकेकर, प्रफुल्ल हडकर, ठेकेदार ओमकार पाताडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!