सनराईज सामाजिक संस्था मालवण आणि बांदिवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कै. शिवप्रसाद गुरव यांच्या स्मरणार्थ बांदिवडे येथे झालेल्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद .
मसुरे | प्रतिनिधी : आधुनीक युगात व आगामी काळात सामाजीक स्तरावर दाग दागिने या इतकीच मनुष्यजातीला रक्ताच्या गुंतवणुकीची किती गरज आहे हे आता सर्वांना पटलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदीवडेसारख्या छोट्या गावातूनही आता त्यासंबंधी प्रकल्प आयोजीत होतायत व तेथील ग्रामस्थ व संबंधीत ते यथाशक्ती यशस्वी करतायत याचेही नुकतेच उदाहरण घडले आहे. सनराईज सामाजिक संस्था मालवण आणि बांदिवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कै. शिवप्रसाद गुरव यांच्या स्मरणार्थ बांदिवडे येथे झालेल्या रक्तदान शिबिरात 52 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये 7 दुर्मिळ रक्तदात्यांसह 14 नवीन रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. विशेष म्हणजे यात 2 महिला रक्तदात्या होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालय रक्तपेढी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.अमित आवळे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची तनपुरे, केंद्रप्रमुख श्री. देशमुख सर, गा.पं.सदस्या श्रीम. निशा परब, मुख्याध्यापक श्री. आचरेकर सर, आरोग्यसेवक श्री.काळे, आरोग्यसेविका श्रीम.पोवळ, अंगणवाडी सेविका श्रीम. सावंत व श्रीम. पवार, श्रीम.विमल चव्हाण, श्री.आप्पा परब आदी मान्यवर उपस्थित होते.
बांदिवडे येथील नियमित रक्तदाते आणि तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.लखन बांदिवडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात कै. दत्तप्रसाद गुरव यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच केंद्रप्रमुख देशमुख सर यांनी आपल्या मनोगतातुन सनराईज आणि बांदीवडे ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याबद्दल कौतुक करत नियमित रक्तदानाचे महत्त्व विशद केले. सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालय रक्तपेढी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.अमित आवळे यांनी नियमित रक्तदानाचे फायदे तसेच रक्तदान केल्यानंतर ची संकलित केलेल्या रक्तावर होणाऱ्या विविध टेस्ट आणि त्याची विभागणी याबद्दल महत्वाची माहिती दिली. यावेळी जिल्हा रक्तपेढीच्या अधिपरिचारिका श्रीम.प्रांजली परब, समुपदेशक श्री. सुनील वानोळे, श्री.सुहास डोंगरे, श्री.नंदकुमार आडकर,श्री. नितीन गावकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी रक्तदान आणि वाढदिवस यांचा योग जुळून आल्याने आडवली च्या श्री. नरेश सावंत याला विशेष सन्मान करून गौरविण्यात आले.
या रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी सनराईज मालवण चे अध्यक्ष गणेश मालंडकर, उपाध्यक्ष तुषार चव्हाण, सुबोध चव्हाण, मिलिंद चव्हाण, शाहुलखन बांदिवडेकर, सागर परब, जयप्रताप बांदिवडेकर, निलेश परब, सागर बांदिवडेकर, प्रथमेश परब, मुन्ना बांदिवडेकर यांनी मेहनत घेतली. प्रास्ताविक शाहुलखन बांदिवडेकर यांनी तर आभार मिलिंद चव्हाण यांनी मानले.
या रक्तदान शिबिरासाठी आयोजकांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदानाच्या पवित्र कार्यात ज्या रक्तदात्यांनी आपला सहभाग दर्शवला त्या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांनी आभार मानले आहेत.
“पच्चास तोला”पेक्षाही दोन संख्यांनी जास्त सामाजिक बांधिलकी जपत आयोजक व रक्तदात्यांनी एक “वास्तव” गरज ओळखली याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.