संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
स्वातंत्रदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त रोटरी क्लब ऑफ मँगोसीटी देवगड तर्फे शालेय आणि खुल्या गटासाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा १५ ऑगस्टला शेठ म.ग.हायस्कूल येथे सकाळी १०.३० ते १२.३०. वाजता घेण्यात येईल .तरी स्पर्धकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे.
स्पर्धेसाठी विषय १ ली ते ४ थी – रंग भरण. ५ वी ते ७ वी – ध्वजारोहण सोहळा, ८ वी ते १० वी – ध्वजारोहण सोहळा खुला गट – थोर क्रांतिकारक व्यक्तीचित्र. स्पर्धेसाठी आयोजकांकडून कागद पुरविण्यात येईल. रंग व ब्रश स्पर्धकाने आणायचे आहेत.
बक्षिसे खालील प्रमाणे राहतील१ ली ते ४ थी – वस्तू रूपाने ५ वी ते ७ वी – १ नंबर ५०० रू.२ नंबर ३००रू. ३ नंबर २००रू. ८ वी ते १० वी – १ नंबर ७००रू. २ नं ५००रू. ३ नंबर ३००रू. खुला गट – १ नंबर १०००रू.२ नंबर ७००रू. ३ नंबर ५०० रू.तरी आपल्या संपर्कातील चित्रकारांस ह्याची माहिती द्यावी स्पर्धेमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मँगोसीटी देवगड यांनी केले आहे.