नागपुर | ब्युरो न्यूज : पायलटला हृदयविकाराचा त्रास झाल्याने बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. बांगलादेश एअर लाईनचे हे विमान मस्कत हून ढाक्याला जात होते. पायलटला हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने सकाळी ११:४० च्या सुमारास विमान तातडीने नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. पायलटला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विमानातील प्रवासी पर्यायी विमानाची व्यवस्था केल्यानंतर रवाना होतील, अशी माहिती संचालक आबीद रुही यांनी दिली. हे विमान रायपुर जवळ होते आणि त्याने इमर्जन्सी लँडिंगसाठी कोलकाता एटीसीशी संपर्क साधला होता. कोलकाता एटीसीने वैमानिकांची संपर्क साधला, तेव्हा त्यांनी जवळच्या विमानतळावर आपत्कालीन लँडिंगचा सल्ला दिला.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -