मसुरे । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये दिनांक ७ सप्टेंबर पर्यंत जमावबंदी लागू असल्या कारणाने दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी नांदगाव येथील नियोजित कोकण हायवे जन आंदोलन आता दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी करण्याचे ठरविण्यात आलेले आहे याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक उद्योजक डॉ दीपक परब यांनी केले आहे. ह्या जन आंदोलनाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी स्थानीक पातळीवर समिती बनविण्याचे काम चालू आहे तरी ज्या सभासदांना स्वेच्छेने ह्या समितीमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी स्थानिक समन्वयक आणि ह्या जन आंदोलनाचे प्रमुख श्री.सुरेश मोरये यांना खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. श्री.सुरेश मोरये (७५८८४५०५८९),डॉ. दीपक परब (९८२०६३२३१८)
अमित वेंगुर्लेकर (९१४५३६००४३),उत्तम दळवी
(९७६९०७५०३६).