महाड | ब्युरो न्यूज : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक वीस मार्च १९२७ साली अस्पृश्यांच्या मूलभूत मानवी हक्कांसाठी पाणी प्राशन करून चवदार तळ्याचा सत्याग्रह केला,असे हे ऐतिहासिक असे महत्त्व प्राप्त झालेले चवदार तळे. या तळ्याला चवदार तळे असे नाव का पडले त्याचे कारण असे की तळ्यामध्ये १४ विहिरी आहेत. असे आज पर्यंत ऐकायला मिळत होते. मात्र यावर्षी उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर तळ्यात शिरल्यामुळे चवदार तळ्यातील पाणी पूर्णपणे गढूळ झाले होते. गाळ उपसल्या मुळे तळ्याच्या तळाशी ११ विहिरी पाहायला मिळत आहेत. मात्र, तीन विहिरी गेल्या कुठे असा सवाल अनेकांकडून मोठ्या कुतूहलाने विचारला जात आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -