सावंतवाडी | प्रतिनिधी : श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्गाच्या संचालिका वीणा दळवी यांनी श्री राधाकृष्ण संगीत विद्यालय या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात संगीत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. संगीत शिक्षिका सौ वीणा दळवी मॅडम अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मार्फत घेण्यात येणाऱ्या संगीत अलंकार परीक्षेत उत्तीर्ण होऊन ही मानाची उपाधी मिळवली आहे. संगीत कला मंच बेळगाव या केंद्रातून त्यांनी ही परीक्षा दिली होती. हल्लीच स्वर्गवासी झालेले जेष्ठ गायक पंडित दिनकर पणशीकर सर आणि बेळगाव येथील ज्येष्ठ गायिका डॉ. स्नेहा राजुरीकर यांचे त्यांना यासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले संगीत अलंकार परीक्षेत मिळवलेल्या त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -