ओटवणे | प्रतिनिधी : विजयदुर्गची विजय गाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि त्याचा गौरवशाली इतिहासाचा जागर व्हायला हवा असे हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हंटले आहे. मराठा साम्राज्याचे शक्तिस्थळ असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ला गौरवशाली इतिहासाची साक्ष देतो. या गोष्टी केवळ पर्यटनाच्या दृष्टीने नव्हे तर ऐतिहासिक नाविक अशा अनेक दृष्टीने महत्वाच्या आहेत.
हिंदू विधीज्ञ परिषदेने पत्रकात पुढे असेही म्हंटले आहे की, छत्रपती शिवरायांनी वर्ष १६५३ मध्ये हा किल्ला ताब्यात घेऊन. त्याचे विजयदुर्ग असे नामकरण केले त्याकाळी होणारी सागरी आक्रमणे थांबवण्यासाठी या प्राचीन किल्ल्याच्या भोवती संरक्षक दगडी भिंत हा स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. शासनाने विजयदुर्ग किल्ल्याविषयी संशोधनाची व्यापक प्रसिध्दी करावी . वर्ष १९९८ मध्ये झालेल्या संशोधनाला आधारभूत धरून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुढील संशोधन करावे . ऐतिहासिक ज्ञानाचा गौरवशाली इतिहास पाठ्यपुस्तकात तसेच शासकीय संकेतस्थळांवरही प्रसिध्द करावा असे निवेदनात म्हतले आहे.