नवी दिल्ली | ब्युरो न्यूज : अफगाणिस्तानातील ३५ नागरिकांना गुरुवारी हवाई दलाच्या विमानाने भारतात आणण्यात आले. या नागरिकांमध्ये २४ भारतीय आणि अकरा नेपाळी नागरिकांचा समावेश आहे.
गुरुवारी १८० पेक्षा जास्त नागरिकांना परत आणण्यात येणार होते. परंतु तालिबान्यांनी शहरात अनेक चेक पोस्ट आणि इतर निर्बंध लागले आहेत. हे अडथळे पार करून त्यांना विमानतळापर्यंत यायला उशीर झाला, त्यामुळे त्यांना आणता आले नाही. याआधी भारताने ८०० हून अधिक नागरिकांना परत आणले आहे.