25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

लाक्षणिक उपोषणानंतर माजी सैनिक नागोजी खरात यांचे 15 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण…!

- Advertisement -
- Advertisement -

एस .टी महामंडळ प्रशासनाचा भोंगळ कारभारामुळे माजी सैनिकला सहन करावा लागतोय मनस्ताप ही गंभीर बाब..

शिरगांव | संतोष साळसकर :
२८ फेब्रुवारी २००१ रोजी आर्मी मधून रिटायर्ड झाल्यावर अर्मीच्या आरक्षित जाग्यातून एस .टी महामंडळामध्ये सुरक्षा रक्षक पदी माजी सैनिक नागोजी परशुराम खरात यांची २८/०८/२००४ रोजी नेमणूक झाली. नेमणूक झाल्यानंतर माजी सैनिकांची वेतन निच्छीती करायची असते. तरी २००७ मध्ये वेतन निच्छीती करण्यात आली. परंतु ती रद्द केली, कारण कनिष्ठ वेतन श्रेणी वर असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही असे परिपत्रक देऊन ती रद्द करण्यात आली.


कायम वेतन श्रेणी वर आल्यावर ती देण्यात यावी असे त्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. वेतन निश्चिती अद्याप करण्यात आलेले नाही ही वेतन निश्चिती करण्याबाबत वारंवार तरी एस टी महामंडळाचा प्रशांसनाकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करत असताना आज -उद्या होईल अशी उडवा उडवीची उत्तर देऊन व आश्वासन देऊन फसवणूक केली. हे सर्व करत असताना ते खरात हे ३१/ ०५/ २०२२ रोजी एस टी महामंडळ मधून सेवानिवृत्त झाले. तरीही त्यांची वेतन निच्छिती करण्यात आलेली नाही.म्हणून खरात यांनी सदर विषयाला अनुसरून दिनांक २८/०७/२०२२ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले परंतु एस टी प्रशासना कडून त्यांना समाधान कारक उत्तर देन्यात आले नाही. संबधित अधिकारी श्री गोसावी व इतर संबधित अधिकारी त्यांनी या ठिकाणी ठोस असे लेखी आश्वासन दिले नाही. “आम्ही तुम्हाला या आधी जे दिले तेव्हढे यावर काही देणं नाही त्यामुळे तुम्ही उपोषणापासून माघार घ्या” असे तोंडी समजूत काढत होते त्यावर श्री खरात यांनी अधिकारी यांच्या कडे मी करत असलेली मागणी अयोग्य आहे असं तरी आम्हाला लेखी द्या अशी मागणी केली. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही लेखी स्वरूपात लिहून दिले नाही. प्रशासनाकडून कोणतीही ठोस निर्णय न आल्यामुळे सात वाजेपर्यंत उपोषण करते उपोषण स्थळी उपस्थित होते. सदर उपोषण एक दिवशी लाक्षणिक उपोषण असल्यामुळे नियमित वेळी स्वतःच उपोषणकर्ते यांनी माघार घेतली.१४ ऑगस्ट २०२२ रोजी पर्यंत सदर विषय मार्ग न लावल्यास प्रशासनाला पुन्हा एकदा अमरण उपोषणाचे निवेदन दिले. सदर उपोषण हे जिल्हाधिकारी कार्यालय समोर वाहतूक विभाग कणकवली या कार्यालयाच्या विरोधात १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. या झालेल्या उपोषण स्थळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे, उपोषणकर्ते माजी सैनिक नागोजी खरात, रत्नदीपक खरात, बाळकृष्ण खरात व इतर उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

एस .टी महामंडळ प्रशासनाचा भोंगळ कारभारामुळे माजी सैनिकला सहन करावा लागतोय मनस्ताप ही गंभीर बाब..

शिरगांव | संतोष साळसकर :
२८ फेब्रुवारी २००१ रोजी आर्मी मधून रिटायर्ड झाल्यावर अर्मीच्या आरक्षित जाग्यातून एस .टी महामंडळामध्ये सुरक्षा रक्षक पदी माजी सैनिक नागोजी परशुराम खरात यांची २८/०८/२००४ रोजी नेमणूक झाली. नेमणूक झाल्यानंतर माजी सैनिकांची वेतन निच्छीती करायची असते. तरी २००७ मध्ये वेतन निच्छीती करण्यात आली. परंतु ती रद्द केली, कारण कनिष्ठ वेतन श्रेणी वर असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही असे परिपत्रक देऊन ती रद्द करण्यात आली.


कायम वेतन श्रेणी वर आल्यावर ती देण्यात यावी असे त्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. वेतन निश्चिती अद्याप करण्यात आलेले नाही ही वेतन निश्चिती करण्याबाबत वारंवार तरी एस टी महामंडळाचा प्रशांसनाकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करत असताना आज -उद्या होईल अशी उडवा उडवीची उत्तर देऊन व आश्वासन देऊन फसवणूक केली. हे सर्व करत असताना ते खरात हे ३१/ ०५/ २०२२ रोजी एस टी महामंडळ मधून सेवानिवृत्त झाले. तरीही त्यांची वेतन निच्छिती करण्यात आलेली नाही.म्हणून खरात यांनी सदर विषयाला अनुसरून दिनांक २८/०७/२०२२ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले परंतु एस टी प्रशासना कडून त्यांना समाधान कारक उत्तर देन्यात आले नाही. संबधित अधिकारी श्री गोसावी व इतर संबधित अधिकारी त्यांनी या ठिकाणी ठोस असे लेखी आश्वासन दिले नाही. "आम्ही तुम्हाला या आधी जे दिले तेव्हढे यावर काही देणं नाही त्यामुळे तुम्ही उपोषणापासून माघार घ्या" असे तोंडी समजूत काढत होते त्यावर श्री खरात यांनी अधिकारी यांच्या कडे मी करत असलेली मागणी अयोग्य आहे असं तरी आम्हाला लेखी द्या अशी मागणी केली. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही लेखी स्वरूपात लिहून दिले नाही. प्रशासनाकडून कोणतीही ठोस निर्णय न आल्यामुळे सात वाजेपर्यंत उपोषण करते उपोषण स्थळी उपस्थित होते. सदर उपोषण एक दिवशी लाक्षणिक उपोषण असल्यामुळे नियमित वेळी स्वतःच उपोषणकर्ते यांनी माघार घेतली.१४ ऑगस्ट २०२२ रोजी पर्यंत सदर विषय मार्ग न लावल्यास प्रशासनाला पुन्हा एकदा अमरण उपोषणाचे निवेदन दिले. सदर उपोषण हे जिल्हाधिकारी कार्यालय समोर वाहतूक विभाग कणकवली या कार्यालयाच्या विरोधात १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. या झालेल्या उपोषण स्थळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे, उपोषणकर्ते माजी सैनिक नागोजी खरात, रत्नदीपक खरात, बाळकृष्ण खरात व इतर उपस्थित होते.

error: Content is protected !!