कोरोना काळात दरमहा पाचशे रुपये भत्ता
मुंबई | ब्युरो न्यूज : आशा स्वयंसेविकाना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दर महा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. कोरोना महामारी सुरू असेपर्यंत दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता देण्यासही राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
ही वाढ जुलै २०२१ या महिन्यापासून देण्यात येईल यासाठी १३६ कोटी रुपयांचा वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. आशा वर्कर आणि घट्ट प्रमुखांना मागील महिन्यात मानधन वाढीसाठी राज्यस्तरीय बेमुदत काम बंद आंदोलन करत संप केला होता. त्यावेळी मानधन वाढीचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.