अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेणार
मुंबई | ब्युरो न्यूज : राज्य सरकार मधील गट अ आणि गट ब श्रेणीतील अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला राज्य सरकार अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोना काळात अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. अधिकारी संघटनांची देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यानी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती त्या अनुषंगाने गुरुवारी या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला.