नवी दिल्ली | ब्यूरो न्युज : केंद्र सरकारने ड्रोन उद्योग संदर्भात नवीन नियमावली जारी केली असून , केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी नावे ड्रोन धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत सरकारने ड्रोनच्या वापरासंबंधीचे नियम शिथिल केले आहे. छोटे ड्रोन चालवण्यासाठी कोणत्याही नोंदणी किंवा परवाना जारी करण्याआधी सुरक्षा मंजुरीची आवश्यकता भासणार नाही. त्याचबरोबर ड्रोन उडवण्या संबंधीचे शुल्क देखील कमी करण्यात आले आहे. ड्रोनच्या उपयोगासाठी सदर करावयाची फॉर्म्स ची संख्या देखील कमी करून पाच वर आणण्यात आली आहे. व शुल्क रचना चौस्तरीय करण्यात आली आहे. नव्या ड्रोन नियमांमुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाईला चांगली उभारी मिळण्याची शक्यता आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने शासकीय संस्था आणि सामान्य लोकांशी चर्चा केल्यानंतर नवीन नियमावली सादर केली. ड्रोन संदर्भातील नियम १५ ऑगस्ट २०२१ रोजी सादर करण्याचे निश्चित केले होते. मात्र सरकारने जनमत जाणून घेण्याच्या दृष्टीने धोरणात काही महत्वाचे बदल केले आहेत.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -