बांदा | राकेश परब :
मुळ आरोस व सद्यस्थितीत न्हावेली-रेवटेवाडी येथे वास्तव्यास असलेले दशरथ लक्ष्मण परब (82 वर्ष) यांचे शनिवारी राहत्या घरी दुःखद निधन झाले. एक यशस्वी आंबा बागायतदार म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.
यंत्र नसतानाही ओसाड जमिनीवर कष्ट करत दशरथ परब यांनी पत्नी सुमित्रा यांच्या सहकार्याने अनेक एकरावर आंबा बागायत तयार केली. सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात ते एक प्रसिद्ध आंबा व्यापारी बनले. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुमित्रा, मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील परब यांचे ते वडील होत.