५० रक्तदात्यांनी केले रक्तदान
आचरा / विवेक परब : आज दिनांक २६/०८/२०२१ रोजी श्री ठाणेश्वर मित्रमंडळ वायंगणी व जिल्हा ब्लड बँक याच्या सहकार्याने वायंगणी ग्रामपंचायत सभागृह येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. एकून ५० रक्त दात्यानी रक्तदान केले. यावेळी डॉ. कोळंबकर यांचे प्रमुख मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यावेळी सरपंच सौ.संजना रेडकर, डाँ. बेळणेकर जिल्हा ब्लड बँक, पोलिस पाटील सुनिल त्रिंबककर, चिंदर उपसरपच दिपक सुर्वे, माजी सरपंच प्रज्ञा धुळे, पेडणेकर सर, अनिल महाजन, श्री. दशरथ पाटील हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते तसेच मंडळाचे कार्यकर्ते शुभम त्रिंबककर, रितेश लाड, संकेत पाटील, दिनेश पेडणेकर, संतोष पेडणेकर, सचिन रेडकर, वैभव बांदेकर, मयुर पेडणेकर, निखिल पेडणेकर, मंदार बांदेकर, गुरु आचरेकर, रमेश महाजन, गणेश चव्हाण, बाबु आडारकर, शब्दकुमार कांबळी, शंकर परब, रावजी सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळा तर्फे सर्व दात्यांचे आभार मानण्यात आले आहे.