आचरा । विवेक परब : केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या स्थगित झालेल्या जन आशिर्वाद यात्रेचा सुधारीत कार्यक्रम आज जाहिर करण्यात आला. त्या प्रमाणे शनिवार दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी दोन वाजता आचरा येथे मालवण तालुक्यात दाखल होत आहेत. या यात्रेच भव्य स्वागत मालवण तालुक्याच्यावतीने आचरा येथे दुपारी २:०० वा. करण्यात येणार आहे. त्यानंतर हि यात्रा २:४५ वा. मालवण शहरात दाखल होईल, मालवण शहरात भरड नाका येते या यात्रेचे जोरदार स्वागत करून बाजार पेठ मार्गे पिंपळ करून ही यात्रा कुंभारमाठ येथे ३:३० वा.दाखल होईल कुंभारमाठ येथे स्वागत केल्यानंतर यात्रा चौके येथे ३:४० वा.जाईल चौके येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांन मार्फत स्वागत करून मालवण कट्टा येथे ४:०० वा. यात्रेचं भव्य स्वागत करण्यात येईल अशी माहिती तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर यांनी दिली.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -